
पुणे : ससून रुग्णालय परिसरातून दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त केल्यानंतर सुरू झालेल्या अमली पदार्थ प्रकरणाची व्याप्ती चार हजार कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. विविध कारवायांमध्ये पुणे पोलिसांनी जप्त केलेले तीन हजार ६७२ कोटींचे एक हजार ८३६ किलो मेफेड्रॉन आणि दिल्ली येथून आरोपी संदीप यादवने परदेशात पाठविलेले ४३६ कोटींचे २१८ किलो, असे एकूण चार हजार १०८ कोटी रुपयांचे मेफेड्रोन असल्याचे या प्रकरणात पुढे आले आहे.