

Arrest of Ajay Sarvade in Karnataka
sakal
पुणे : कुख्यात नीलेश घायवळच्या टोळीतील गुंड अजय सरवदे याच्या कोथरूडमधील घरातून पिस्तुलासह चारशे काडतुसे जप्त केली आहेत. त्यापैकी दोनशे काडतूस घायवळच्या फार्महाउसमध्ये आणि लोणावळ्यात फायर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात नीलेश घायवळ टोळीतील गुंडानी १७ सप्टेंबर रोजी एका तरुणावर गोळीबार केला होता. तसेच, त्यानंतर एका व्यक्तीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अजय सरवदे आणि बंट्या चौधरी हे दोघे फरार होते. कोथरूड पोलिसांनी सरवदेला कर्नाटकमधील गंगापूर येथून अटक केली.