पुणे पोलिसांना 'असा' सापडला १२० किलो गांजासह 34 लाखांचा मुद्देमाल!

Pune_Cannabis_Smuggler
Pune_Cannabis_Smuggler

पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असल्याने ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. असे असतानाही गांजाची तस्करी करीत मुंबईला गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून १२० किलो गांजा, कार आणि टेम्पो असा ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

समीर हसनाली शेख (वय ३७, रा. जोगेश्वरी बांद्रा प्लॉट मुंबई), हिमायतउल्ला मोहम्मद अली शेख (वय ४१ रा. अंधेरी वेस्ट मुंबई) व अश्विन शिवाजी दानवे (वय २६ रा. अंधेरी मुंबई) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टनम येथून एक स्कोडा कार आणि छोटा हत्ती टेम्पो अशा वाहनातून काहीजण पुणे मार्गे मुंबईला गांजा घेऊन जात असल्याची खबर अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली.

दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महाडिक यांच्या पथकने हडपसर टोलनाका येथे रविवारी पहाटेपासून नाकाबंदी लावली. त्यानुसार पोलिसांनी संशयित स्कोडा गाडी ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली. त्यावेळी गाडीच्या डिकीमध्ये ४८ किलो गांजा मिळून आला.

शेख याच्याकडे चौकशी करता त्याने एका छोट्या टेम्पोमध्ये काही माल पुढे घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानुसार पुणे पोलिसांनी ग्रामीण पोलिसांची मदत घेऊन टेम्पोचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर खालापूर टोल नाका येथे संबंधीत टेम्पो पकडला. नारळाच्या शाहाळेच्या खाली लपवलेला ७२ किलो गांजा जप्त केला. त्यानुसार पथकाने दोन्ही वाहनातून एकूण १२० किलो गांजा, १ स्कोडा गाडी, १ छोटा हत्ती टेम्पो, विशाखापट्टनम ते वडोदराचा रिटर्न ई-पास असा एकूण ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com