minor caught with homemade pistol in Pune : कात्रज परिसरात पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तूल जप्त केले. मुलाने सांगितले की पिस्तूल त्याच्या साथीदाराने दिले होते. प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पुणे : कात्रज परिसरात एका अल्पवयीन मुलाकडून पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त केला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.