
Pune Police
Sakal
पुणे : पोलिसांनी कुख्यात बंडू आंदेकर, नीलेश घायवळ आणि रिझवान ऊर्फ टिपू पठाण यांच्या बेकायदा मालमत्तांवर जप्ती, अतिक्रमणांवरील कारवाया आणि बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान पोलिसांनी कोथरूड, कोंढवा, हडपसर, बिबवेवाडी, सहकारनगर, कात्रज, येरवड्यासह इतर भागातील सराईत टोळ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.