esakal | Pune : पोलिसांनी आपले वेगळेपण सिद्ध करावे- डॉ. बबन जोगदंड
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : पोलिसांनी आपले वेगळेपण सिद्ध करावे- डॉ. बबन जोगदंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : जीवनामध्ये अशक्य काहीच नाही. पोलिसांनी आपली प्रतिमा उंचावण्यासाठी पोलीस सेवेमध्ये नवनवीन उपक्रम राबवून आपले वेगळेपण सिद्ध करावे,असे आवाहान यशदा पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ.बबन जोगदंड यांनी केले.

लष्कर पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी दर गुरुवारी एका मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याचा उपक्रम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अशोक कदम यांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आज ७ वे व्याख्यान यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांचे झाले. त्यांनी 'बदलते जग व पोलीस प्रशासन' या विषयावर माहिती दिली.

या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले, भविष्यामध्ये सर्वच क्षेत्रात मोठे प्रचंड बदल होणार आहेत. पुढे जगामध्ये माहितीचा स्फोट होईल.त्याचा अनेक क्षेत्रावर परिणाम होईल. भविष्यातील पोलीस प्रशासन तंत्रज्ञानावर आधारित असल्याने हे तंत्रज्ञान अवगत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.यावेळी त्यांनी पोलिसांना संवाद कौशल्य, इंग्रजी भाषेचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, आत्मविश्वास आणि मेहनत ही पंचसूत्री सांगितली.

पोलिसांनी सामान्य लोकांसाठी काम करताना आपल्या कामातून आपले वेगळेपण सिद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी. नवीन गोष्टी शिकण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.हे युग स्पर्धेचे नसून सादरीकरणाचे आहे, त्यामुळे आपले सादरीकरण व व्यवस्थापन कौशल्य उत्तम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

प्रारंभी पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी या व्याख्यानामागची भूमिका विशद केली.लष्कर पोलीस ठाण्याचे इतर पोलीस ठाण्याच्या तुलनेत वेगळेपण कसे आहे, याबद्दल माहिती दिली. अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनची तंत्रज्ञानात उत्कृष्ट कामगिरी असल्याचेही ते म्हणाले.

loading image
go to top