Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

Latest Pune News: स्मशानभूमी अर्धवट जळालेली लाकडे व शिल्लक लाकडावरुन पोलिसांनी तपासाची सुरवात केली.
Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!
Updated on: 

Rajkumar Thorat वालचंदनगर ता. २५ कानून के हात लंबे होते है... याचा अनुभव पुणे जिल्हातील नागरिकांनी घेतला. खुनाचे धागे-दोरे नसताना ही वालचंदनगर पोलिसांनी तावशी (ता.इंदापूर) येथील स्मशानभुमीमध्ये जाळलेल्या अज्ञात व्यक्तिच्या खुनाचा तपास लाकुड व हाडाच्या राखेवरुन लावून खुन करणाऱ्या दोघांना जेरबंद केले. चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे खुन प्रकरणाचा तपास लावल्याने ग्रामस्थांना पोलिसांचे कौतुक केले.

याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय ३०) ,विशाल सदाशिव खिलारे (वय २३ रा.दोघे, रा.गोळखी,ता.फलटण,जि.सातारा) यांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली. या दोघांनी हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४,रा.गंगाखेड जि.परभणी) या व्यक्तीचा खुन केला होता.

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!
Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com