Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Latest Pune News: भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा आमदार राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना त्यांचे निधन झाले आहे.
Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू
Updated on

दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील गार - बेटवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बाळासाहेब भोसले यांचे विधानसभा निवडणुकीचा जल्लोष करीत असताना निधन झाले आहे. दौंड विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तथा आमदार राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना त्यांचे निधन झाले आहे.

दौंड - अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील नगर मोरी येथील शासकीय धान्य गोदामात आज (ता. २३) मतमोजणी सुरू होती. दुपारी मतमोजणीत राहुल कुल यांनी मोठी आघाडी घेतल्याने महायुतीच्या समर्थकांचा मोठा जल्लोष सुरू होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com