
पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याने आपल्या पोलिसांच्या काठीचा गैरवापर करत कारवाईची भीती दाखवत ट्रक चालकाकडून १० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रकचालकाने तक्रार केल्यानंतर या सिंहगड रोड पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलिस शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.