

Pune railway sub engineer job fraud 2026
sakal
पुणे : रेल्वेत सब-इंजिनिअर पदावर नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगार तरुण-तरुणींची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी एका आरोपीला अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या आर्मी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.