

Pune Police Van Loses Control in Sadashiv Peth : पुणे शहरातील गजबजलेल्या सदाशिव पेठ परिसरात एका भरधाव पोलीस व्हॅनने अचानक नियंत्रण गमावल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एकामागून एक तब्बल सात वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघाताचे दृश्य एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.