पुणे : कोरोनाची अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई; सायबर पोलिसांचा 'वॉच'!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 March 2020

'सोशल मिडीया लॅब'द्वारे पोलिसांची करडी नजर 
पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या अंतर्गत 'सोशल मिडीया लॅब' कार्यान्वित करण्यात आली आहे.

पुणे : सोशल मीडियावर कोरोना रोगाबाबत चुकीची माहिती किंवा अफवा पसविण्याची उठाठेव काही जणांकडून सर्रासपणे केली जात आहे. आता मात्र अशा अफवा व चुकीची माहिती पसरविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सायबर पोलिसांनी अशा व्यक्तींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना व्हायसरच्या बाबतीत सोशल मिडीयावरून अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा निर्माण होत आहे. परिणामी नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हॉट्‌स ऍप, फेसबुकवर कोरोना संदर्भात अफवा पसरविणारे अनेक मेसेज कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता फॉरवर्ड केले जात आहेत. याची पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.

- विषाणू घालवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गोवऱ्या-तुळशीचा धुपारा

पुणे पोलिसांच्या सायबर सेलने अशा अफवा पसरविणाऱ्यांवर आता लक्ष केंद्रीत केले आहे. सोशल मिडीयावर अफवा पसरविताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी करोना संदर्भात अफवा पसरविणारे मेसेज खात्री न करता पुढे पाठवू नयेत. तसेच, कोणत्याही आफवांवर विश्वास ठेऊ नये. प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचा पालन करावे, असे आवाहन ही पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

- मित्र, नातेवाईक विदेशात आहेत? कोरोनामुळं बदललेले व्हिसाचे नियम वाचा!

'सोशल मिडीया लॅब'द्वारे पोलिसांची करडी नजर 
पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या अंतर्गत 'सोशल मिडीया लॅब' कार्यान्वित करण्यात आली आहे. या लॅबद्वारे अफवा पसरविणारे मेसेज आढळून आल्यास तत्काळ ते सोशल मिडीयावरून काढून टाकले जात आहे. सोशल मिडीयावर करडी नजर ठेवली जात असल्याची माहिती विशेष शाखेकडून देण्यात आली आहे. 

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; आता...

''कोरोना रोगासंदर्भात चुकीची माहिती किंवा अफवा पसरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.''
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police will take action against those who spread rumors about Coronavirus