Pune Municipal Election
esakal
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाविकास आघाडीबरोबर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र आता यात मोठा ट्विस्ट आला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या म्हणजेच सोमवारी याची अधिकृत घोषणा होईल, असंही सांगण्यात येत आहे.