

Land Deal Controversy Escalates as Pune Leaders Exchange Barbs Over Ethics and Criminal Cases
Sakal
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे महापौर असताना खासगी बिल्डरच्या नावावर असलेली गाडी वापरत होते, याच बिल्डरने जैन बोर्डिंगच्या व्यवहारात निविदा भरली होती असा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तर ‘निवडणुकांमध्ये पराभूत झाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. ते रोज उठून काहीही आरोप करतात. त्यांच्यावर जमीन बळकावल्याचे गुन्हे आहेत,’’ अशा शब्दात मोहोळ यांनी शुक्रवारी प्रतीत्त्युत्तर दिले.