खुर्चीच्या राजकारणात जनता भरडली जाते - करूणा मुंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karuna Munde

राज्यात बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार असे अनेक प्रश्न असताना देखील याकडे दुर्लक्ष करून, खुर्ची वाचवण्याचे राजकारण केले जात असल्याची टीका शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा मुंडे यांनी केली.

Karuna Munde : खुर्चीच्या राजकारणात जनता भरडली जाते - करूणा मुंडे

पुणे - राज्यात बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार असे अनेक प्रश्न असताना देखील याकडे दुर्लक्ष करून, खुर्ची वाचवण्याचे राजकारण केले जात असल्याची टीका शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणा मुंडे यांनी केली.

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादा गायकवाड, शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा - करुणा मुंडे, सीआर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष - हेमचंद्र मोरे या तिन्ही संघटनेच्या प्रमुखांनी यापुढे राजकीय प्रवासासाठी आघाडी तयार करत असल्याबद्दल शुक्रवार (ता. १८) नोव्हेंबर, नवी पेठ पुणे येथे पत्रकार संघात पत्रकार परिषदेत घेतली होती, यावेळी मुंढे या बोलत होत्या.

पुढे बोलताना मुंडे, म्हणाल्या,पुण्यामध्ये एक नवीन जन- सामान्य आघाडी या नावाने एक नवीन आघाडी स्थापन करण्यात येणार आहे. आघाडीसाठी अन्य तीस ते चाळीस संघटना देखील यामध्ये सामील होतील, या आघाडीचे प्रमुख उदिष्ट म्हणजे अनेक पक्षाचे कार्यकर्ते दिवस - रात्र आपला पक्ष मोठा होण्यासाठी उन, वारा, पाऊस याची पर्वा न करता कार्य करत असतात. त्यांच्याकडे नेतेमंडळी दुर्लक्ष करतात. अश्या हिऱ्यांना जनसामान्य आघाडी बळ देणार आहे.

तसेच त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी देणार आहे. सध्याचे राजकारण पाहता सर्व नेते हे फक्त स्वतःचा विचार करतात. सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलतात. यामुळे नागरिक देखील राजकारणाचा तिरस्कार करायला लागलेली आहेत. राजकरणाला एक वेगळे वळण देण्यासाठी तसेच सर्व सामाजिक संघटना व सामाजिक संस्था एकत्र येऊन, आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांना संधी देण्याचा प्रेयत्न करणार आहोत.