पुणे : काँग्रेसला पुणे जिल्ह्यात तिसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संग्राम थोपटे आणि रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यानंतर आता पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप (Sanjay Jagtap BJP Entry) लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.