
Ravindra Dhangekar
Sakal
पुणे : महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे, असे असताना शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी गुंड नीलेश घायवळ याचा भाजपच्या नेत्यांशी संबंध जोडून आरोपांची सरबत्ती लावली आहे. त्यामुळे महायुतीमधील वातावरण बिघडले आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घायवळला पिस्तुलाचा परवाना दिल्याने त्यांच्यावरही धंगेकरांनी टीका केली. यावरून शिवसेनेत नाराजी पसरल्याने वरिष्ठ नेत्यांनी धंगेकरांची कानउघाडणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, हे प्रकार त्वरित थांबवा असेही बजावले असल्याचे समजते.