Conflict Over 25 Years of Ajit Pawar’s Leadership
पुणे : पुणे महापालिकेवर भाजपची केवळ पाच वर्ष सत्ता होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गेली २५ वर्ष महापालिकेत सत्ता असताना दूरदृष्टी ठेवून कामे केली नाहीत. त्यामुळे शहरात अनेक प्रश्न निर्माण झाले. पवारांच्या कारभाराला कंटाळूनच भाजपला सत्ता दिली आहे. त्यांना हे जुने कारभारी नकोत, असे प्रत्युत्तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.