
पुणे : पुणे महापालिकेत आयुक्त नवलकिशोर राम हे बैठक घेत असताना मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे हे थेट बैठकीत घुसल्याने आयुक्त आणि शिंदे यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने शिंदे थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेले, पण अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील प्रसंग टळला. हा प्रकार घडल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आयुक्त कार्यालयातून बाहेर पडत नसल्याने पोलिसांनी जबरदस्तीने शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या वादाला मराठी - अमराठी असा राजकीय रंग देण्याचा ही प्रयत्न मनसेकडून करण्यात आला आहे.