Pune Porsche Accident : डॉ. तावरे अन् मकानदारचे पाच महिन्यात सुमारे ७० फोन; तपासातून धक्कादायक माहिती आली समोर

Pune Porsche Accident : मकानदार याची भूमिका पोलिसांना पहिल्यापासूनच संशयास्पद होती. तो अवैध धंद्यांशी निगडित असून हुक्का पार्लरही चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे
porsche motors pune accident
porsche motors pune accidentesakal

पुणे : ससून रूग्णालयातील न्याय वैद्यक शास्त्र विभागाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे आणि कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेला अश्पाक मकानदार हे गेल्या पाच महिन्यांपासून संपर्कात होते. त्यांचे एकमेकांना सुमरे ७० फोन झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अश्पाक बाशा मकानदार (वय ३६, रा. धानोरी, विश्रांतवाडी) आणि अमर संतोष गायकवाड (वय २७, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) यांनी रक्ताच्या नमुने बदलण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी यापूर्वी डॉ. तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे, तर मुलाला वाचविणाऱ्या विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यातील डॉक्टरांना सात जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अग्रवाल पती-पत्नी १० जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे. मकानदार याची भूमिका पोलिसांना पहिल्यापासूनच संशयास्पद होती. तो अवैध धंद्यांशी निगडित असून हुक्का पार्लरही चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या बरोबरच तो अवैध धंद्यावरून पोलिसांसाठी पैसेही गोळा करत असल्याचे तपासात समोर आले आहे. मकानदार याचा अपघात प्रकरणात देखील महत्त्वाचा सहभाग आहे. रक्त बदलण्याचा प्रकार डॉ. तावरे आणि मकानदार यांच्यातील चर्चेतूनच झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्रवालने डॉ. तावरे यांना कोणामार्फत पैसे दिले, याचा शोध गुन्हे शाखेकडून घेण्यात येत होता. तपासात अगरवालने अश्पाक आणि अमर यांच्याशी संपर्क साधून डॉ. तावरे याला पैसे दिल्याची माहिती मिळाली होती.

मकानदार आणि डॉ. तावरे यांनी दिला रक्त बदलण्याचा सल्ला

मकानदार आणि डॉ. तावरे यांनीच अल्पवयीन मुला ऐवजी आईचे रक्त बदलण्यास सांगितल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. ज्या दिवशी रक्ताची डीएनए तपासणी होण्यासंबंधी बातमी पसरली व विशाल अग्रवालवर अटकेची टांगती तलवार पाहता मकानदार आणि त्यांच्यातील व्यवहार लांबणीवर पडला. दरम्यानच्या काळात विशाल अग्रवाल आणि मकानदारची एका कॅफेत भेटही झाली. याच बैठकीत मकानदारने विशाल अग्रवाल यांना तुमच्यावर कारवाई होईल असे सांगितले होते. त्यानंतर विशाल अग्रवाल हे संभाजीनगर येथे फरार झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com