Pune Porsche accident : पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांचा खुलासा; म्हणाले, मी फोन करत असतो पण...

Anjali Damania allegation on Ajit Pawar, Ajit Pawar response : ''मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन करत असतो. अशा घटना घडल्यावर मी पाठिशी घाला, असं कुणाला सांगत नाही. अजित पवार जरी असला तरी कारवाई करा, असं मी सांगतो.''
ajit pawar
ajit pawaresakal
Updated on

पुणेः पुण्यातल्या कल्याणी नगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघातामध्ये मी कुणालाही फोन केला नसल्याचं खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचं नाव घेऊन गभीर आरोप केला होता.

अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं की, पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना फोन केला होता, याचा खुलासा सीपींनी करावा आणि पवारांचा फोन ताबडतोब जप्त करुन तपासणीसाठी पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मी कधीच कुणाला सोडण्यासाठी फोन केला नाही, असं अजित पवार म्हणालेत.

ajit pawar
Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एकाला अटक; ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी पैसे....

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले की, पुण्यातील अपघात प्रकरणात डॉक्टर, पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचं बेजबाबदारपणाचं‌ कृत्य होतं. नातू, वडील, आजोबांवर ‌कारवाई केलीय.. जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. मी पालकमंत्री म्हणून अधिकाऱ्यांना फोन करत असतो. अशा घटना घडल्यावर मी पाठिशी घाला, असं कुणाला सांगत नाही. अजित पवार जरी असला तरी कारवाई करा, असं मी सांगतो.

ajit pawar
Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपीच्या जामीनाच्या आदेशावर सही देणारे जज नव्हे तर...; याप्रकरणातही चौकशीची शक्यता

अजित पवार पुढे म्हणाले की, अपघात प्रकरणात कुणाचाही दबाव नाही. सुनील टिंगरे ‌यांचं नाव घेतलं जात होतं, मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. चौकशीअंती दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
Sunetra Pawar Ensures Immediate Medical Aid for Injured Woman in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com