

Two Pune police officers dismissed for negligence in the Porsche accident that killed two IT engineers
पुणे : पोर्श मोटार अपघात प्रकरणात निलंबित केलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिला आहे. पोलिस कारवाईत गंभीर त्रुटी आढळल्याने तत्कालीन पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पोलिस अंमलदार आनंदा भोसले आणि अमित शिंदे यांच्या मूळ वेतनवाढीस पाच वर्षांसाठी स्थगिती देण्यात आली आहे.