
Pune Porsche Car Accident: देशभर गाजलेल्या पुणे 'पोर्शे' कार अपघात प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. अपघातप्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी 'पोलीस महासंचालक' कार्यालयाकडे पाठविला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटक केली होती.