Pune Porsche Car Crash: "मला मारु नका, हवे तेवढे पैसे देतो..."; दोघांना कारनं उडवल्यानंतरही बिल्डरपुत्राचा तोरा होता कायम

Pune Porsche Car Crash: कल्याणीनगर अपघातातील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कारचा वेग खूपच जास्त होता आणि अल्पवयीन आरोपी चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातात जखमी झालेल्या दोघांपैकी एक जण धडकेनंतर हवेत 15 फूट वरती फेकला गेला होता.
Pune Porsche Car Crash
Pune Porsche Car CrashEsakal

कल्याणीनगर अपघातातील प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. अशातच पुणे पोर्शे प्रकरणी अवघ्या 15 तासांत जामीन मिळालेल्या अल्पवयीन आरोपींबाबत आणखी एक खुलासा समोर आला आहे. या घटनेनंतर त्याला जमावाने घेरले असता तो लोकांना पैसे घेऊन तिथून जाऊ देण्याचे आवाहन करत असल्याचे वृत्त आहे. याआधी आणखी एका प्रत्यक्षदर्शीने उघड केले होते की, घटनेच्या वेळी अल्पवयीन आरोपी इतका मद्यधुंद होता की मारहाणीचाही त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही.

सध्या अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. 'आज तक'शी बोलताना अमीन शेख नावाच्या व्यक्तीने त्या रात्रीची घटना सांगितली आहे. अपघाताच्या वेळी ते घटनास्थळापासून काही अंतरावर उपस्थित होते. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, अल्पवयीन मुलगा "तुला पाहिजे तेवढे पैसे घे, मला मारहाण करू नकोस, तुला पाहिजे तेवढे पैसे मी घेईन आणि आत्ताच देईन", असे आरोपी ओरडत होते.

कल्याणीनगर अपघाताचे काही फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये अल्पवयीन आरोपीवर परिसरात जमलेल्या जमावाने हल्ला केला होता. याशिवाय आणखी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अल्पवयीन आरोपी मित्रांसोबत दारू पिताना दिसत आहे.

Pune Porsche Car Crash
Pune Porsche Crash : ''माझ्या मुलाला मदत करा'' आरोपीच्या बिल्डर वडिलांचा डॉ. तावरेला फोन?, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

इंडिया टुडेशी बोलताना एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कार खूप वेगाने जात होती आणि अल्पवयीन चालक मद्यधुंद अवस्थेत होता. ते म्हणाले की, अपघातात जखमी झालेल्या दोघांपैकी एक अपघात झाल्यानंतर हवेत 15 फूट फेकला गेला होता. तो म्हणाला, 'पोर्शेचा वेग इतका होता की आम्हाला टक्कर दिसली नाही, पण खूप मोठा आवाज ऐकू आला.' रविवारी १९ मे रोजी हा अपघात झाला.

Pune Porsche Car Crash
Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणात मोठी कारवाई! ससूनमधील ३ जण निलंबित, ब्लड सॅम्पल बदलण्याचं प्रकरण भोवलं

पुढे ते म्हणाले, 'गाडी घटनास्थळापासून काही अंतरावर थांबली कारण एअरबॅग्ज उघडल्या होत्या. अल्पवयीन चालक गाडीतून बाहेर येताच त्यांनी त्याला पकडून घटनास्थळी नेले आणि त्याने काय केले ते दाखवले. चॅनलशी बोलताना प्रत्यक्षदर्शीने सांगितले की अल्पवयीन आरोपी चालक दारूच्या नशेत होता आणि त्याला जमावाने मारहाण केली, पण मारहाणीचा त्यावर अजिबात परिणाम होत नव्हता'. काही वेळातच पोलीस आले आणि चालकाला स्टेशनवर घेऊन गेल्याची माहिती त्यांनी दिली.

Pune Porsche Car Crash
Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com