
पुणे : कल्याणीनगर ‘पोर्श’ अपघात व ससून रुग्णालयात अल्पवयीन मुलांचे रक्त बदलल्या प्रकरणात कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालने जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. आईच्या शस्त्रक्रियेसाठी तात्पुरता जामीन मिळावा, असे कारण देत अर्ज करण्यात आला होता.