
Pune Grand Challenge
Sakal
पुणे : पुणे जिल्ह्यात जागतिक दर्जाच्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ स्पर्धेचे आयोजन केले असून यातील सुमारे ७५ किलोमीटरचा मार्ग पुणे शहरातून जाणार आहे. त्यासाठी पथ विभागाने १४५ कोटी ७५ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. पण या निविदेच्या अटीशर्तींवरून आरोप केले जात असताना महापालिका प्रशासनाने आम्हाला नोव्हेंबर अखेरपर्यंत कामे पूर्ण करायची आहेत. त्यामुळे क्षमता असलेल्या ठेकेदारांकडून कामे करून घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.