
Pune rain
esakal
पुणे - गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शनिवारी (ता. २७) पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी शनिवारी खूप जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. या जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.