पुणे : रोज ससूनची ड्युटी नको; जेल कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याला धमकी

In pune for daily duty at Sassoon hospital Prison staff threatened to senior officer
In pune for daily duty at Sassoon hospital Prison staff threatened to senior officer

पुणे : घरात एक वर्षाचा लहान मुलगा असतानाही ससुनमधील ड्यूटी लावल्यामुळे
संतप्त झालेल्या जेल कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यास अरेरावीची भाषा वापरत त्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याने येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

जयकुमार सोमनाथ शिंदे (वय 39, शासकीय कर्मचारी निवासस्थान, येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्या जेल कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रमणी अर्जुन इंदुरकर (वय 55,कारागृह अधिकारी शासकीय वसाहत, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिंदे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंदुरकर हे येरवडा कारागृहात उपअधिक्षक या पदावर कार्यरत आहेत. ते सध्या येरवडा येथील मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहात असलेल्या तात्पुरते कारागृहात नेमणुकीला आहेत. दरम्यान, कारागृहातील कैदी प्रकाश फाले यास वैद्यकीय उपचारासाठी ससुन रुग्णालयात दाखल केले होते. त्यामुळे फिर्यादी यांनी सोमवारी शिंदे व महादेव म्हस्के या दोन जेल कर्मचाऱ्याना फाले याच्यावर देखरेख ठेणासाठी ससुन रुग्णालयात  रात्रपाळीची ड्यूटी लावली. त्यामुळे शिंदे हा संतप्त झाला. 

पुणेकरांनो, शक्यतो घरातच राहा! बाहेर जाणार असला तर, महत्त्वाची बातमी वाचा

फिर्यादी हे सोमवारी दुपारी पावणे दोन वाजता येरवडा बाजार येथील श्रीकृष्ण मेडिकल समोर थांबले होते. त्यावेळी शिंदे तेथे आला.त्याने फिर्यादीस "दररोज मला का ससुनमधील ड्यूटी लावतो.तुझे आदेश असतील तरीही मी ससुन मधील रात्रपाळीची ड्यूटी करणार नाही" असे सुनावले. त्यावेळी फिर्यादीने त्यास वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलण्याची ही पद्धत आहे का ? असा प्रश्न केला. त्यावेळी शिंदे याने फिर्यादीस "मी कोणत्याही परिस्थितीत ससुनमधील ड्यूटी करणार नाही. मला एक वर्षाचा मुलगा आहे. जर माझ्या मुलाला काही कमी जास्त झाले. तर मी तुझ्या खानदानाला मारुन टाकेन" अशी धमकी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शांतमल कोल्लूरे करत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com