कोंढवा - मनसुख भाई कोठारी नॅशनल स्कूलचा विद्यार्थी स्वानंद भोरे याने आपल्या अद्वितीय मानसिक गणित कौशल्याच्या बळावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुणे शहराचे नाव उज्ज्वल केले आहे..पॅडरबॉर्न, जर्मनी येथे १५ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या स्पर्धेमध्ये स्वानंदने १० अंकी १० गणितांची (एकूण १००० संख्यांची) मानसिक बेरीज फक्त १ मिनिट २८.४० सेकंद इतक्या कमी वेळेत करून हा गौरव मिळवला. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या प्रकारातील त्यांची कामगिरी जागतिक दर्जाची असून ही नोंद अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे..स्वानंद भोरे गेल्या काही वर्षांपासून मेंटल मॅथ या क्षेत्रात सातत्याने प्रावीण्य मिळवत आहेत. मोठ्या अंकांची बेरीज, वजाबाकी, विभाजन किंवा गुणाकार हे सर्व काही कागद-पेनशिवाय हाताळण्याची त्यांची क्षमता अनेक स्पर्धांमध्ये सिद्ध झाली आहे.गंभीर एकाग्रता, उच्च स्तराचा मेंटल प्रोसेसिंग स्पीड आणि उत्तम स्मरणशक्ती ही त्यांच्या यशामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येते. स्वानंदच्या या यशामागे त्याच्या पालकांचा मोठा सहभाग आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याची प्रतिभा लहानपणापासून ओळखून त्याला प्रोत्साहन दिले..प्रतिक्रियास्वानंद नेहमीच आकडेमोडीत रमलेला असायचा. साध्या गणितापलीकडे जाऊन मोठ्या संख्यांवर काम करण्याची त्याची आवड दिवसेंदिवस वाढत गेली. आम्ही त्याला फक्त पाठिंबा दिला आणि त्याने भरारी घेतली.- राजकुमार भोरे, स्वानंदचे वडीलगिनीज रेकॉर्ड मिळाल्यानंतरही थांबण्याचा विचार केलेला नाही. भविष्यात आणखी कठीण गणितीय आव्हाने स्वीकारून नवे जागतिक मानांकन मिळवण्याचा संकल्प आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं, विशेषतः पुणे शहराचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सतत सराव व मेहनत करणार आहे.- स्वानंद भोरे.स्वानंद भोरेचे आतापर्यंतचे वर्ल्ड रेकॉर्ड- २०२४ मध्ये अल्टरनेटिव्ह बुक ऑफ रेकॉर्ड्सद्वारे मानसिक बेरीजमध्ये मानसिक गणनाचा जागतिक विक्रम.- मानसिक गणित विश्वचषक २०२४ जागतिक रँक १- मानसिक गणित विश्वचषक २०२३ जागतिक रँक १- सुपर टॅलेंटेड किड अवॉर्ड - २०२२- गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड - २०२२- २०२२ मध्ये दोन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड.- माइंड स्पोर्ट्स ऑलिंपियाड लंडन चॅम्पियनशिप कांस्य पुरस्कार २०२४ .- मॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑस्ट्रेलिया जागतिक क्रमवारीत पहिला. - २०२४- मेमोरियाड वर्ल्ड मेंटल स्पोर्ट्स ऑलिंपिक दुबई 2024 - कांस्यपदक विजेता.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.