esakal | पुणे: मांजरीमध्ये ऑगस्टअखेर कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनाला होणार सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

covaxin

पुणे: मांजरीमध्ये ऑगस्टअखेर कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनाला होणार सुरुवात

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : भारत बायोटेक कंपनीकडून मांजरी येथील कोरोना लसीच्या प्लांटमधून येत्या ऑगस्ट महिन्यांच्या अखेरीस कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन सुरू होणार आहे. त्यासाठी विविध स्तरावर तयारी सुरू असून, या प्लांटमधून जास्तीत जास्त लसीचे उत्पादन घेण्याचे नियोजन आहे. देशात सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड आणि रशियाच्या स्पुतनिक व्ही या तीन लसी उपलब्ध आहेत. देशात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरणाला सुरवात करण्यात आली. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे बऱ्याच ठिकाणी लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: पुणे: हजारभर इग्वाना, दोनशेभर कासव आणि फायटर माशांची तस्करी; दोघांना अटक

भारत बायोटेक कंपनीने गुजरातमधील अंकलेश्वर प्लांटमूधन वर्षाला २० कोटी कोव्हॅक्सिन लसीच्या डोसचे उत्पादन घेण्यात येणार आहे. भारत बायोटेकची उपकंपनी असलेल्या चिरॉन बेहरिंग व्हॅक्सिनमार्फत ही लस उत्पादित करण्यात येणार आहे. यासोबतच आता पुण्यातही भारत बायोटेकची सहयोगी संस्था असलेल्या बायोवेट प्रायव्हेट कंपनीकडून कोव्हॅक्सिनच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यात येणार आहे.

हेही वाचा: रामदेव बाबांवर 'देशद्रोह' लावा; IMA चं PM मोदींना पत्र

या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, भारत बायेटेकला मांजरीमध्ये प्लॅंट उभारण्यासाठी ११.५८ हेक्टर जागा ताब्यात दिली आहे. या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या हैदराबाद आणि नॅशनल इन्स्ट्यिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) मधील निवृत्त शास्त्रज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अन्न व औषध प्रशासन, महावितरण, केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार विभागाच्या परवानग्या घेण्यात येत आहेत. तसेच, तिसऱ्या टप्प्यात यंत्रसामग्री तपासणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

भारत बायोटेकने शंभर दिवसांत लस उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कंपनीकडून तीन टप्प्यांमध्ये काम सुरू आहे. सध्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून ३० ते ४५ दिवसांत आवश्यक परवाने घेण्यात येतील. यानंतर ऑगस्टअखेर प्रत्यक्ष लस उत्पादित करण्याचे नियोजन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी