घरातील उत्सव सेलिब्रेट न करता, पुण्याच्या प्राध्यापकाचे COVID रिलिफ फंडला दिले 4.5 लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KOLEKAR

पुण्यातील सिविल इंजिनिअर प्रोफेसर यशंवत कोलेकर यांनी कोरोनाच्या संकटात आर्थिक मदत करुन माणूसकीचं दर्शन घडवलं. कोलेकर यांनी त्यांच्या कुटुंबातील उत्सव सेलिब्रेट करण्याऐवजी कोरोना रिलिफ फंडसाठी देणगी दिली आहे.

घरातील उत्सव सेलिब्रेट न करता, पुण्याच्या प्राध्यापकाचे COVID रिलिफ फंडला दिले 4.5 लाख

पुणे- कोरोना महामारीने अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण केली. याकाळात लोकांना शारीरिक अंतराचे पालन करावे लागले. असे असले तरी याच काळात लोकांना एकमेकांची सर्वाधिक गरज पडली.  या काळात अनेक लोक दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले. पुण्यातील सिविल इंजिनिअर प्रोफेसर यशंवत कोलेकर यांनी कोरोनाच्या संकटात आर्थिक मदत करुन माणूसकीचं दर्शन घडवलं. कोलेकर यांनी त्यांच्या कुटुंबातील उत्सव सेलिब्रेट करण्याऐवजी कोरोना रिलिफ फंडसाठी देणगी दिली आहे. कोरोना महामारीची झळ सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना बसली. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली, अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. अशावेळी कोलेकर यांनी कोरोना काळात मदत करण्याचे ठरवले. त्यांनी कुटुंबातील प्रत्येक उत्सव सेलिब्रेट करण्याऐवजी, जसे की वडीलांचा जन्म दिवस किंवा आईचा 75 वा वाढदिवस किंवा मुलांचा वाढदिवस अशा वेळी त्यांनी कोविड रिलिफ फंडसाठी योगदान दिले.

यशंवत कोलेकर यांनी आतापर्यंत साडेचार लाखांची आर्थिक मदत केली आहे. मार्च ते नोव्हेंबर या काळातील प्रत्येक उत्सवावेळी त्यांनी कोरोना रिलिफ फंडसाठी आर्थिक मदत केली आहे. कोलेकर यांनी कोविड रिलिफ फंडसह कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल साईन्स, भुवनेश्वर आणि सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या मदर ग्लोबल फाऊंडेशनलाही आर्थिक मदत केली आहे. The Indian Express ने यासंदर्भातील वृत्त दिलंय. कोलेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, कोरोना काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली, सरकारने आरोग्य क्षेत्रांवर मोठा खर्च केला. पण, सरकारला आणखी मदतीची आवश्यकता होती. अशावेळी मी सरकारला मदत करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन लोकांना मदत होईल.

UGC च्या अभ्यासक्रमातून हिंदुत्व विचारधारेचा प्रचार; ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

कोलेकर यांनी फंड देण्याबरोबरच एक यूनिक इंटरनॅशनल वेबिनार आयोजित केले होते. यामाध्यमातून त्यांनी निधी गोळा केला आहे. रसिस्ट्रेशन फीच्या माध्यमातून त्यांनी 1 लाखांपर्यंत पैसे जमा केले आहेत. हे पैसेही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान रिलिफ फंडला देण्यात आले आहेत. कोलेकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून कोरोना काळात स्वयंस्फूर्त मदत केल्याप्रकरणी प्रशस्तीपत्रही मिळालं आहे. कोरोना रुग्णांची संख्या अद्यापही झपाट्याने वाढत आहे. या संकटाच्या काळात अनेकांनी सढळ हाताने मदत केली. 

Web Title: Pune Professor Yashwant Kolekar Dumps Family Celebrations Donates Rs 4 Lakh Covid19

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top