

Pune Police Sub Inspector Caught Accepting Bribe Raid Reveals Huge Assets
Esakal
दोन कोटी रुपये लाचेची मागणी करून, ४६ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. या अधिकाऱ्याच्या घरझडतीत ५१ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पोलिस उपनिरीक्षक प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ३५) याला रविवारी रास्ता पेठ परिसरात ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना पकडले.