

Pune Police Raid Airport Area Pub, 80–100 Youths Detained
Esakal
पुण्यात एका प्रसिद्ध पबवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं धाड टाकली. पहाटे तीन वाजता पबमध्ये डान्स पार्टी सुरू असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी या ठिकाणाहून ८० ते १०० तरुण तरुणींना ताब्यात घेतलंय. पबला रात्री दीड वाजेपर्यंतच परवानगी असताना पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता. विमानतळ परिसरात असलेल्या द हौज कम्युन पबवर केलेल्या कारवाईने खळबळ उडालीय.