Devendra Fadnavis Inaugurates Pune Development Projects
sakal
पुणे : "पीएमपीएल बस, रिंगरोड व मेट्रोचे जाळे निर्माण करून व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करत पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करु. केंद्र सरकारच्या मदतीने राज्यातील महायुती सरकार हे पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणार आहे. भविष्यात शाश्वत, आधुनिक पुणे, त्याहीपेक्षा कार्यक्षम आणि अधिक चांगल्या पद्धतीने राहण्यायोग्य शहर कसे होईल, यादृष्टीने महायुतीचे सरकार प्रयत्नशील आहे. ' असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.