esakal | Pune : महापालिकेचा पहिला बायोगॅस प्रकल्प मुदत संपल्याने बंद
sakal

बोलून बातमी शोधा

pune

महापालिकेचा पहिला बायोगॅस प्रकल्प मुदत संपल्याने बंद

sakal_logo
By
समाधान काटे

शिवाजीनगर : ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सन २००९ साली पुणे शहरातील पहिला बायोगॅस प्रकल्प मॉडेल कॉलनी येथे पाटबंधारे विभागाच्या जागेवर सुरू केला होता.सदरील प्रकल्पाची मुदत संपल्याने २०१९ साली

संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल आॕडिट) करून,मुदत संपल्याने तो बंद करण्यात आला.हॉटेल, सोसायटी मधील ओला कचरा जमा करून त्यापासून वीजनिर्मिती केली जात होती.या प्रकल्पावर जवळपास १६७ पथदिवे लावले जायचे.मात्र दोन वर्षांपासून हा प्रकल्प बंद आहे.

"बायोगॅस प्रकल्प पुनर्निर्मिती करण्यासाठी आव्वाच्या- सव्वा किमती

सांगितल्या जातात.या परिसरात हॉटेल, हॉस्टेल,मेस भरपूर असल्याने हा प्रकल्प सुरू असणं तेवढंच गरजेचं आहे.प्रकल्प सुरू केला तेव्हा जवळपास पंचवीस वर्षाची मुदत सांगितली होती,मग तो दहा वर्षातच कसा बंद पडला? हा प्रकल्प सुरू करण्यात यावा".

- शामला देसाई, नॅशनल सोसायटी क्लिन सिटी.

"पुणे शहरातील पहिला बायोगॅस प्रकल्प होता.प्रकल्पाचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल आॕडिट) केल्यानंतर तो बंद करण्यात आला आहे.शहरी भाग असल्याने जबाबदारी घेऊन तो सुरू करता येणार नाही"

- संजय नांदरे, ठेकेदार.

"सदरील ठिकाणी सोलार किंवा बायोगॅस प्रकल्प उभा करायचा हा निर्णय प्रशासन व लोकप्रतिनिधी घेतील"

- शिवाजीराव नलावडे आरोग्य निरीक्षक महापालिका.

"बांधकाम करताना जो राडारोडा पडतो तो संकलन करण्यासाठी या जागेचा वापर करण्यासाठी आम्ही आयुक्तांना प्रस्ताव दिला आहे.तिथं राडारोडा जमा करून तो वाघोली कडे एकत्रित घेऊन जाणार आहोत"

- श्रीकृष्ण दीक्षित कनिष्ठ अभियंता महापालिका.

loading image
go to top