

Purandar Airport Compensation Report Sent
Sakal
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादन केलेल्या जमिनींची मोजणी आणि त्यासाठी देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या रकमेचा तपशील असलेला अहवाल जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालास हिरवा कंदील मिळाल्यानंतर मोबदला वाटपाचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे या महिनाअखेर शेतकऱ्यांना प्रत्यक्षात देण्यात येणाऱ्या मोबदल्याची रक्कम निश्चित होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.