

Pune Book Fair Set for December 13-21
Sakal
पुणे : लाखो पुस्तकांच्या दुनियेची सफर घडविणारा... पुस्तकप्रेमींच्या मनाचा अचूक वेध घेणारा... अन् वाचक-लेखकांच्या भेटीचा अनोखा योग साधणारा पुणे पुस्तक महोत्सव यंदा १३ ते २१ डिसेंबरदरम्यान होणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित या महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यानिमित्त ज्ञान-साहित्याचा जल्लोष, पुस्तकप्रेमींचा मेळा आणि साहित्यिकांची मांदियाळी रंगणार आहे.