

Mumbai trips for file approvals in Pune PWD
sakal
पुणे: सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मुख्य अभियंतापदी गेल्या अडीच महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती न झाल्याने विभागाचा बोजवारा उडाला आहे. सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईतील अधिकाऱ्याकडे असल्याने, महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेण्यासाठी पुणे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दर दोन दिवसांनी शासकीय वाहनाने मुंबई गाठावी लागत आहे. त्यामुळे वेळेचा, इंधनाचा मोठा अपव्यय होत आहे.