Pune River Pollution : पुण्यातील लकडी पुलाखाली राडारोडा टाकण्याची घटना, महापालिकेचे दुर्लक्ष

Dumping Site Near Clean-up Area : पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी स्वच्छता मोहीम राबवलेल्या मुठा नदीपात्रात, लकडी पुलाखाली थेट अनेक ट्रक राडारोडा टाकल्याची घटना समोर आली आहे, ज्यामुळे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Trucks Dump Debris in Mutha River Bed Right Where Pune Commissioner Held Clean-up Drive.

Trucks Dump Debris in Mutha River Bed Right Where Pune Commissioner Held Clean-up Drive.

Sakal

Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी गेल्या आठवड्यात मुठा नदी पात्रात ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. त्याच परिसरात थेट अनेक ट्रक राडारोडा आणून टाकल्याची घटना समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात लकडी पुलाच्या खाली राडारोडा टाकला जात असताना याकडे मात्र महापालिकेच्या बांधकाम विभागासह घोले रस्ता शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता तरी राडारोडा टाकणाऱ्याला शोधून कारवाई करणार का? या कडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com