

Railway
sakal
पुणे - रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत वर्षभरात पुण्याहून ९६ रेल्वेच्या तब्बल ९६४ विशेष फेऱ्या पूर्ण केल्या. त्यातून दोन लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक झाली. पुण्याहून सर्वाधिक रेल्वेच्या फेऱ्या दानापूरसाठी झाल्या आहेत. पुणे ते दानापूरदरम्यान रेल्वेच्या ६७ फेऱ्या झाल्या असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.