एप्रिलमध्ये पुणे रेल्वेला कोट्यावधींचा नफा

 एप्रिलमध्ये पुणे रेल्वेला कोट्यावधींचा नफा
Updated on

पुणे : रेल्वेद्वारे पुण्यातून(Pune Railway) मालवाहतुकीत वाढ होत असून गेल्या वर्षांच्या तुलनेत सुमारे १२ कोटी २० लाखांनी उत्पन्न वाढले आहे. ऑटोमोबाईल, खते, साखर, पेट्रोलियम उत्पादने आदींची मालवाहतूक शहरातून देशातील विविध राज्यांत होत आहे.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात १ लाख ३० हजार टन माल वाहतूक रेल्वेद्वारे पुणे विभागातून झाली होती. तर यंदा ही वाहतूक १ लाख ६० हजार टन झाली आहे. यंदा एप्रिलमध्ये झालेल्या मालवाहतुकीतून रेल्वेला १९ लाख ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर, गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ७ कोटी ३० लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत यंदा १२ कोटी २० लाखांनी पुणे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली आहेत.

 एप्रिलमध्ये पुणे रेल्वेला कोट्यावधींचा नफा
मराठा आरक्षण रद्द! पुण्यात आंदोलकांना घेतलं ताब्यात

यंदा एप्रिल महिन्यात चिंचवड स्थानकवरून ऑटोमोबाईल उत्पादनांची १५ मालगाड्यांतून विविध राज्यांत वाहतूक झाली. यंदा लॉकडॉऊन असूनही गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मालवाहतुकीशी रेल्वेने बरोबरी केली आहेत एप्रिल महिन्यात रेल्वेच्या पुणे विभागाने २ हजार ६३७ वॅगनमधून मालवाहतूक केली आहे. गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत ती तब्बल ८८ टक्क्यांनी अधिक आहे. तसेच यंदाच्या एप्रिल महिन्यात ११ हजार ५७९ वॅगनमधून पुणे विभागात माल उतरविण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत ६ हजार ७३१ वॅगनने वाढ झाली आहे.

पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा, अतिरिक्त व्यवस्थापक सहर्ष वाजपेयी यांच्या मार्गदर्शनानुसार रेल्वेने पुणे विभागात बिझनेस डेव्हलपमेंट युनिटची स्थापना केली आहे. वरिष्ठ मंडल परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला आणि वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर रेल्वेने नवे ग्राहक शोधून मालवाहतूक वाढविली आहे. रेल्वेद्वारे वाहतूक सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे. त्यामुळे रेल्वेद्वारे मालवाहतुकीला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. स्वप्नील नीला यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Residents of remote Khopadewadi village near Rajgad Fort were forced to perform a funeral under a tarpaulin in heavy rain due to the absence of a crematorium, highlighting the lack of basic infrastructure in the region.
Nirmala Nawale NCP appointment
Garbage bins overflowing near the entrance of Padmashri Dr. Manibhai Desai Arts and Commerce College in Uruli Kanchan have triggered concerns over hygiene and student safety, with residents questioning the Gram Panchayat's waste management.
JCBs and Poclains Ravage Pune Hills; Environmentalists Raise Alarm
Marathi News Esakal
www.esakal.com