
Bhusawal Running Room
Sakal
पुणे : रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनदेखील भुसावळ येथील रनिंग रूममधील (चालक, गार्ड व तिकीट पर्यवेक्षक यांच्या विश्रांतीसाठीचे ठिकाण) अन्नपदार्थांचा दर्जा सुधारलेला नाही. त्यामुळे गुरुवारपासून पुण्यासह देशातील दहा रेल्वे विभागांच्या तिकीट पर्यवेक्षकांनी येथील जेवणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.