esakal | पुणे रेल्वे स्थानक झालं ९७ वर्षांचे
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे रेल्वे स्थानक झालं ९७ वर्षांचे

पुणे रेल्वे स्थानक झालं ९७ वर्षांचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसंस्थ

पुणे : ब्रिटिशांनी बांधलेले आणि हेरिटेज स्ट्रक्चरचा दर्जा मिळालेले पुणे रेल्वे स्टेशन मंगळवारी (ता. २७) ९७व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मुंबई-ठाण्याखालोखाल पुणे स्टेशन हे राज्यातील सर्वात जुने स्टेशन आहे.

सुरुवातीला मुंबई-पुणे मार्गापुरते मर्यादीत असलेल्या पुणे स्टेशनचा कालांतराने विस्तार होत गेला. कोरोनामुळे सध्या मर्यादित गाड्या आणि प्रवासी असले, तरी एरवी या स्थानकावरून सुमारे २२५ रेल्वेगाड्यांची वाहतूक होते, तर सुमारे दोन लाख प्रवाशांची ये-जा होते. पुणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला मर्यादा असल्यामुळे आता हडपसर रेल्वे स्थानक विकसित करण्यात येत आहे.

हेही वाचा: ...तर निर्बंध कमी होतील, राजेश टोपे यांचं सूचक विधान

रेल्वे स्थानकाचा आराखडा १९१५मध्ये ब्रिटिशांनी तयार केला. वास्तुविशारद पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९२५मध्ये स्थानकाचे काम पूर्ण झाले. या स्थानकाचा उद्घाटन समारंभ मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यासाठी मुंबईहून एक विशेष रेल्वेगाडी पुण्यात आणली होती. त्यावेळी या स्थानकाच्या उभारणीसाठी सुमारे ५ लाख ७९ हजार रुपये खर्च आला होता. पुणे स्थानकाला २० वर्षांपूर्वी मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून गौरविण्यात आले आहे. आशिया खंडातील पहिली डबल डेकर सिंहगड एक्स्प्रेस व पुणे- मुंबई लोहमार्गाचे विद्युतीकरण ही या स्थानकाची देणगी आहे. या स्थानकाचा वर्धापन दिन मंगळवारी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी दिली.

loading image
go to top