esakal | रेल्वे स्थानक परिसरात  स्वच्छतेची ‘ऐशीतैशी’
sakal

बोलून बातमी शोधा

pune-railway-station

 रेल्वे प्रशासनाकडून स्थानक आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी कोटींत खर्च केला जातो. स्वच्छतेसाठी पुणे स्थानकाला ‘वर्ल्ड क्‍लास’चा दर्जा मिळाला आहे. प्रत्यक्षात मात्र स्थानकात स्वच्छेतेची ‘ऐशी की तैशी’ असून, दुर्गंधीबरोबरच, उंदीर, घुशी आणि डासांचा प्रवाशांना सामना करावा लागत आहे. 

रेल्वे स्थानक परिसरात  स्वच्छतेची ‘ऐशीतैशी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - रेल्वे प्रशासनाकडून स्थानक आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी कोटींत खर्च केला जातो. स्वच्छतेसाठी पुणे स्थानकाला ‘वर्ल्ड क्‍लास’चा दर्जा मिळाला आहे. प्रत्यक्षात मात्र स्थानकात स्वच्छेतेची ‘ऐशी की तैशी’ असून, दुर्गंधीबरोबरच, उंदीर, घुशी आणि डासांचा प्रवाशांना सामना करावा लागत आहे. 

रेल्वेच्या पुणे विभागातील सुमारे ५५ स्थानकांवर नियमित स्वच्छता करण्यासाठी वर्षाला सुमारे सहा कोटी रुपये खर्च केला जातो. त्यातील तब्बल साडेतीन कोटी रुपये हे पुणे स्थानकावर खर्च केले जातात. या स्थानकाला ‘वर्ल्ड क्‍लास’चा दर्जा असल्याने येथे सर्वाधिक स्वच्छता केली जात असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र स्थानक परिसरात अपेक्षित स्वच्छता होत नसल्याचे दिसून येते. 

परिसरातील लोहमार्ग अस्वच्छ असल्याने परिसरात उंदीर, घुशींचा सुळसुळाट वाढला आहे. पुणे स्थानकानंतर मिरज आणि कोल्हापूर स्थानकांवर स्वच्छतेसाठी सर्वाधिक खर्च केला जातो. आकुर्डी ते पुणे स्थानक आणि पुणे स्थानक ते हडपसर स्थानकापर्यंच्या लोहमार्गावर वेळोवेळी औषध फवारणी केली जाते. 

तसेच पावडर टाकण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या परिसरातील रूळ अनेक ठिकाणी अत्यंत अस्वच्छ असून, त्या ठिकाणी दुर्गंधी वाढलेली आहे. 

या बाबत प्रवासी अजय जाधव म्हणाले, ‘‘मी अनेक वर्षांपासून रेल्वेने नियमित प्रवास करत आहे. स्थानक व रुळाची स्वच्छता होत असली तरी ती अपेक्षेपेक्षा कमी आहे. स्वच्छता करणारे स्वच्छता करायची म्हणून थोडीफार करतात.’’

विभागातील सर्व स्थानकांवर आणि रुळावर नियमित स्वच्छता केली जाते. मात्र रुळाच्या परिसरातील नागरिकांकडून रूळ अस्वच्छ केले जातात. रुळावर घाण करताना कोणी सापडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
- मिलिंद देऊस्कर, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे

loading image
go to top