

Pune Railway Station Sees Record Diwali Rush
Sakal
पुणे : यंदाच्या दिवाळीत पुणे रेल्वे स्थानकावरून तब्बल ३५ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यासाठी नियमित व विशेष रेल्वे मिळून ११०० रेल्वे धावल्या. २७ ऑक्टोबरला सर्वाधिक दोन लाख ५४ हजार प्रवाशांनी प्रवास केला. ही संख्या अन्य दिवशीच्या प्रवासी संख्येपेक्षा ८० हजारांनी जास्त आहे. रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करताना नियमित रेल्वेंना उशीर होणार नाही, याची विशेष काळजी घेतली.