

Pune
esakal
पुणे: बहुचर्चित व बहुप्रतीक्षित पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाला अखेर सुरुवात झाली. या अंतर्गत पुणे स्थानकावर सहा नवीन फलाट बांधले जात आहेत. यापैकी फलाट क्रमांक ११ व १२ च्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. सध्या सहा फलाट असून टप्प्याटप्प्याने आणखी सहा नवीन फलाट बांधून तयार होतील. स्थानकावर अन्य प्रवासी सुविधा देण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यासाठी सुमारे ६०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे येत्या काळात आणखी ६० नवीन रेल्वे धावणार आहेत.