

Pune Railway Station Gets Major Passenger Upgrade With 22 Crore Holding Area For 7000 General Passengers And Better Safety
sakal
पुणे: विनाआरक्षित (जनरल) प्रवाशांना आता थेट पुणे स्थानकाच्या फलाटावर पोचता येणार नाही. रेल्वे प्रशासन फलाटावरील प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी त्यांची त्रिस्तरीय विभागणी करणार आहे. पुणे स्थानकाच्या बाजूला असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकाजवळ रेल्वेच्या जागेत सुमारे २२ कोटी रुपये खर्चून प्रवाशांसाठी प्रतीक्षा क्षेत्र (होल्डिंग एरिया) तयार केले जात आहे.