
Pune Police
Sakal
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील वॉशिंग सेंटरजवळ एका कोपऱ्यात एकटीच, शांत बसलेली साधारण पंचविशीतील तरुणी... डोळ्यांत भीती आणि चेहऱ्यावर अनामिक वेदना...या तरुणीकडे पाहणाऱ्यालाही काळजी वाटावी अशी तिची अवस्था... कारण जवळच नशेडी तरुणांचा वावर असलेला परिसर... अशा परिस्थितीत काहीही अनर्थ घडू शकला असता... पण या क्षणी तिला मोठा आधार मिळाला, तो म्हणजे पोलिसांचा मायेचा आधार...