Railway Track Crossing Accidents : रेल्वे रुळ ओलांडण्याचा 'शॉर्टकट' ठरतोय घातक; पुण्यात दोन वर्षांत ६०४ प्रवाशांचा मृत्यू
Railway Track Crossing Accidents : पुणे रेल्वे विभागातून (Pune Railway Division) दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. दररोज सुमारे १ लाख प्रवासी या मार्गावर ये-जा करतात. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी कायम असते.
पुणे : रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) गाडी थांबताच काही प्रवासी वेळ वाचवण्यासाठी धोकादायक 'शॉर्टकट' वापरून थेट रेल्वे रुळ ओलांडतात. मात्र, हा शॉर्टकट अनेकदा प्राणघातक ठरत असून, गेल्या दोन वर्षांत तब्बल ६०४ प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे.