
पुणे : दसरा-दिवाळीसाठी घरी जाण्याची ओढ असणाऱ्या नोकरदारांना रेल्वेने आताच ‘वेटिंग’ आणि ‘रिग्रेट’चा संदेश दाखवला आहे. रेल्वेच्या नव्या नियमांनुसार दोन महिने आधी आरक्षण सुरू झाल्यावर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत अनेक रेल्वे गाड्यांची तिकिटे संपली. ‘वेटिंग’चे तिकीटही न मिळाल्याने अनेक प्रवाशांची निराशा झाली.